Maharashtra Political Crisis: Uddhav Thackeray गटाची निवडणूक आयोगाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव

खरी शिवसेना कुणाची? हा वाद सध्या रंगत आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Uddhav Thackeray गटाने निवडणूक आयोगाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना निवडणूक आयोग त्याचा निकाल येण्यापूर्वीच निर्णय घेऊ शकत नाही असा दावा त्यांच्याकडून याचिकेमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची की शिंदे गटाची यामधून तोडगा काढण्यासाठी काही कागदपत्रं सादर करण्यास सांगितली आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावर सुनावणी केली जाऊ नये अशी  याचिकेत मागणी आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)