बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता जनतेसमोर येण्याचे Uddhav Thackeray यांचे शिंदे गटाला आव्हान
पुढे ते म्हणाले, 'जे नाव नव्या आजोबांनी दिले, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवले आणि ज्या नावाचे विचार मी पुढे घेऊन जात आहे त्या नावाशी तुमचा संबंधच काय?'
काल निवडणूक आयोगाने एक महत्वाचा निर्णय देत शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. येऊ घातलेल्या अंधेरी पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांना हे चिन्ह वापरता येणार नाही. या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, 'ज्या शिवसेनेने तुम्हांला राजकीय जन्म दिला, ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, हिंदु अस्मिता जपली त्या शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात? काय मिळाले तुम्हांला?' असा सवाल शिंदे गटाला विचारला.
पुढे ते म्हणाले, 'जे नाव नव्या आजोबांनी दिले, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवले आणि ज्या नावाचे विचार मी पुढे घेऊन जात आहे त्या नावाशी तुमचा संबंधच काय? संकट येतात आणि जातात पण संकटात संधी लपलेली असते. ती संधी मी शोधतोय, त्या संधीच मी सोन करुन दाखविण.' यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला एक आव्हान दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता जनतेसमोर येण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे.
मी कुठेही डगमगलेलो नाहीय, माझ्यात आत्मविश्वास आहे.
तुमची बुद्धी गोठली नसेल तर बाळासाहेबांचं नाव न वापरता लढून दाखवा, स्वतः नवीन पक्ष काढा अन्यथा भाजपमध्ये जा - उद्धव ठाकरे.
सुप्रीम कोर्टातील प्रकल्प प्रलंबित असताना निवडणूक आयोगाचा हा निर्णय मला अपेक्षित न्हवता - ठाकरे.
— Krishna Sonarwadkar (@KrishnaSonarwa1) October 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2022 06:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

