IPL Auction 2025 Live

Mumbai: मध्य रेल्वेचे TTE सुनील नैनानी यांची 10,428 तिकीटविरहित प्रवाशांवर कारवाई, वर्षभरात तिकीट तपासणी करून केली 1 कोटींहून अधिक कमाई

नैनानी व्यतिरिक्त, मुख्यालयाचे (मुंबई) टीटीआय (प्रवास तिकीट निरीक्षक) डी कुमार यांनी बुक न केलेले सामान किंवा योग्य तिकिटाशिवाय प्रवास करण्याच्या 15,053 प्रकरणांमधून 1.43 कोटी रुपये जमा केले.

Central Railway TTE Sunil Nainani (PC - Twitter/@Central_Railway)

Mumbai:  मध्य रेल्वेचे TTE सुनील नैनानी यांनी रेल्वेला 1 कोटी रुपयांचा महसूल कमवून दिला आहे. त्यांनी वर्षभरात 10,428 तिकीटविरहित प्रवाशांना पकडले आहे. नैनानी यांनी चालू आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसून केला आहे. नैनानी व्यतिरिक्त, मुख्यालयाचे (मुंबई) टीटीआय (प्रवास तिकीट निरीक्षक) डी कुमार यांनी बुक न केलेले सामान किंवा योग्य तिकिटाशिवाय प्रवास करण्याच्या 15,053 प्रकरणांमधून 1.43 कोटी रुपये जमा केले. एप्रिल-ऑक्टोबर 2022 या कालावधीत अशा तिकीटविरहित/अनियमित प्रवासामुळे उत्पन्न 193.62 कोटी रुपये होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 93.29 कोटी रुपये होते, जे 107.54% वाढ दर्शवते.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)