Maharashtra Budget Session 2023: महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत असलेल्या उपचारांच्या खर्चाची मर्यादा दीड लाखावरून 5 लाख - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानसभेत घोषणा
महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत असलेल्या उपचारांच्या खर्चाची मर्यादा दीड लाखावरून 5 लाख करण्यात आल्याची घोषणा आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे.
महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत असलेल्या उपचारांच्या खर्चाची मर्यादा दीड लाखावरून 5 लाख करण्यात आल्याची घोषणा आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली आहे. या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)