Tirupati Balaji Temple in Maharashtra: राज्याला मिळणार नवे तीर्थस्थळ; नवी मुंबईमध्ये CM Ekanth Shinde यांच्या हस्ते तिरूमला तिरुपती देवस्थान बालाजी मंदिराचे भूमिपूजन
नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उलवे, सेक्टर 12, नोडे उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी, प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जाऊ न शकणाऱ्या भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी योवेळी सांगितले. (हेही वाचा: वादग्रस्त पोस्टवरुन हिंदू संघटना आक्रमक; कोल्हापूर मुस्लिम समाजाकडून कारवाईची मागणी, पोलिसांनी काढले बंदी आदेश)