Kolhapur News: वादग्रस्त पोस्टवरुन हिंदू संघटना आक्रमक; कोल्हापूर मुस्लिम समाजाकडून कारवाईची मागणी, पोलिसांनी काढले बंदी आदेश

सोशल मीडियात झालेल्या पोस्टसंदर्भात कोल्हापूरातील हिंदू संघटना (Hindu Organization) आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी 'कोल्हापूर बंद'ची हाक देत शिवाजी चौक येथे आंदोलने केली. तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजानेही (Muslim Community Kolhapur) पत्रक काढत समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Kolhapur News: वादग्रस्त पोस्टवरुन हिंदू संघटना आक्रमक; कोल्हापूर मुस्लिम समाजाकडून कारवाईची मागणी, पोलिसांनी काढले बंदी आदेश
Maharashtra Police Bharti | (File Image)

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा औरंगजेब (Aurangzeb) हा वादाचा मुद्दा ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात काही युवकांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्यानंतर आता कोल्हापूरातही सोशल मीडियावर औरंगजेबाच्या संदर्भाने पोष्ट करण्यात आली आहे. परिणामी कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सोशल मीडियात झालेल्या पोस्टसंदर्भात कोल्हापूरातील हिंदू संघटना (Hindu Organization) आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी 'कोल्हापूर बंद'ची हाक देत शिवाजी चौक येथे आंदोलने केली. तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजानेही (Muslim Community Kolhapur) पत्रक काढत समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे कोल्हापू शहरात आणि काही प्रमाणात जिल्ह्यामध्ये मात्र तणाव निर्माण झाला आहे.

समाजकंटकांना ठेचा, मुस्लिम समजाची मागणी

कोल्हापूरातील मुस्लिम समाजाने एक पत्रक काढून पोलिसांना कारवाईचे अवाहन केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, काही तरुणांनी आक्षेपार्ह स्टेटस लावल्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशा तरुणांना कोणीही पाठिशी घालणार नाही. पोलिसांनी अशा समाजकंटकांना शोधून वेळीच ठेचावे. जेणेकरुन समाजात तणाव निर्माण होणार नाही. काही तरुणांनी लावलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकतेला तडा गेल्यासारखे वातावरण झालं आहे. पोलिसांनी समाजकंटकांना शोधावे आणि कडक कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात अशी प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाही. प्राप्त माहितीनुसार मुस्लिम समाजाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकावर कादर मलबारी, आदिल फरास, रियाज सुभेदार, अफजल पिरजादे, जाफरबाबा सय्यद, झाकीर कुरणे, तौफीक मुल्लाणी, अब्दुल हमीद मिरशिकारी, मुश्‍ताक मलबारी, वासीम चाबुकस्वार यांच्या सह्या आहेत. (हेही वाचा, 'औरंगजेबाचे फोटो झळकवणे मान्य नाही, कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही'- Devendra Fadnavis)

कोल्हापूर बंदची हाक

काही तरुणांनी आक्षेपार्ह स्टेटस लावल्याने कोल्हापूरातील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी आज (7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानुसार शिवाजी चौक परिसरात अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर जमा झाले. या तरुणांना पांगविण्यासाठी पोलिसांनी कही प्रमाणात बळाचा वापर केला.

कोल्हापूरात बंदी आदेश

कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सूव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तातडीची पावले उचलली आहेत. शिवाय कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी येत्या 19 जून पर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी हा आदेश काढला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2023 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).