Mumbai Police Received Threatening Call: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांना धमकीचा फोन; शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा केला दावा
कॉलरने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला. यानंतर कॉलरने कॉल डिस्कनेक्ट केला.
Mumbai Police Received Threatening Call: मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास धमकीचा फोन आला. कॉलरने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला. यानंतर कॉलरने कॉल डिस्कनेक्ट केला. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. ते सध्या कॉलरचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा - Mumbai Crime News: मुंबईत संपत्तीच्या वादावरून पत्नीची हत्या, भावावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)