पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना वाहनाने चिरडले, 6 जणांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला

CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी 5 लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement