खेलो इंडिया विद्यापीठ स्तरावरच्या दुसऱ्या स्पर्धेला आजपासून बंगळुरु येथे सुरुवात
व्यकंय्या नायडू या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत.
खेलो इंडिया विद्यापीठ स्तरावरच्या दुसऱ्या स्पर्धेला आजपासून बंगळुरु इथं सुरुवात होत असून उपराष्ट्रपती एम. व्यकंय्या नायडू या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहेत. कोविड नंतर होणाऱ्या या पहिल्याच भव्य क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत देशभरातली 200 विद्यापीठं भाग घेणार आहेत. एकुण 20 क्रिडा प्रकारांमध्ये 4500 खेळाडु भाग घेणार असल्याचं भारतीय क्रिडा प्रधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.