Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी पुणे प्रशासनाने सुरु केला नियंत्रण कक्ष; 'या' ठिकाणी साधू शकता संपर्क
गेले काही दिवस रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव सुरु असून, आता रशियाने युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी आणि इतरांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. असे लोक किंवा त्यांचे कुटुंबीय 202-26123371 वर संपर्क साधू शकतात किंवा 'controlroompune@gmail.com' वर लिहू शकतात, असे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले. गेले काही दिवस रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव सुरु असून, आता रशियाने युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थी आणि इतरांना सुरक्षित परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी समन्वय साधण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)