Pune Lift Collapse Video: देव तारी त्याला कोण मारी! मुलं लिफ्टमधून बाहेर पडताच 10व्या मजल्यावरून खाली कोसळली लिफ्ट; पहा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ

तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोसायटीच्या सदस्यांनी या घटनेबाबत एफआयआर दाखल केला आहे. सुरक्षा उपाय सुधारण्यासाठी अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Pune Lift Collapse Video (PC - Twitter)

Pune Lift Collapse Video: पुण्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अक्षरशा काळजाचा ठोका चुकत आहे. लिफ्ट मधील दोन मुलांचा जीव अगदी थोडक्यात बचावला आहे. कारण, ही मुलं लिफ्टच्या बाहेर पडताच लिफ्ट दहाव्या मजल्यावरून खाली कोसळली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोसायटीच्या सदस्यांनी या घटनेबाबत एफआयआर दाखल केला आहे. सुरक्षा उपाय सुधारण्यासाठी अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)