Sanjay Raut: दोन मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, राज्यपाल, हे काय सुरू आहे ? संजय राऊतांचा सवाल

संजय राऊतांकडून आता असे ट्विट करण्यात आल्यामुळे आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवरती दबाही वाढताना दिसत आहे.

Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले असुन मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आहे. तसेच सरकार मध्ये 160 पेक्षा जास्त आमदार असुनही मंत्रिमंडळ विस्तार अजून होत का नाही आहे अशी टीका विरोधकांकडून होत असते. यावर आता शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी सरकारची दखल घेत राज्यपालांना सवाल केला आहे. संजय राऊत ट्विट करुन म्हटले आहे की, “भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही राज्यपाल, हे काय सुरू आहे ?” असे ट्विट राऊतांकडून करण्यात आलंय. त्यामुळे आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवरती दबाही वाढताना दिसत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement