Baramati: बारामतीतील EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे CCTV फूटेज बंद; सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला केली कारवाई करण्याची मागणी

आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

CCTV footage of the strong room, Supriya Sule (PC - X/@supriya_sule)

Baramati: बारामतीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर ज्याठिकाणी इव्हिएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आले होते, त्याठिकाणचे CCTV फूटेज 45 मिनिटे बंद पडले होते. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे.'

सुप्रिया सुळे यांचे ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif