महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत - शरद पवार

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार (PC - ANI)

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रांवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या चौकशीसंदर्भात निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत की नाही हे मला माहिती नाही. मी एवढेच सांगू शकतो की, याचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)