Thane Water Cut On May 21: ठाणे शहरामध्ये 21 मे दिवशी 12 तास 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रूस्तूमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्य्याची माहिती ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

Water Cut | Pixabay.com

ठाणे शहरामध्ये 21 मे दिवशी टेमघर जलशुद्धिकरण केंद्राच्या  दुरूस्तीच्या कामासाठी तसेच पिसे  उदंचन केंद्र मधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पावसाळापूर्व आवश्यक देखभाल दुरूस्तीचं काम करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यावेळी घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रूस्तूमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्य्याची माहिती ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

ठाण्यात 21 मे दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement