Thane Shocker: ठाण्यात पोलिस असल्याचं भासवून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

विष्णू बांधेकर आणि आशिष गुप्ता अशी आरोपींची नावं असून आज त्यांना अटकेनंतर कोर्टात सादर केलं जाईल.

Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ठाण्यामध्ये एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर झाला आहे. पोलिस असल्याचं भासवून त्या दोन व्यक्ती मुलीच्या जवळ गेल्या. त्यापैकी एकाने या प्रकाराचा व्हिडिओ केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी 5 टीम्स बनवून आरोपींचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींपैकी एक मजूर म्हणून दुसरा चहाच्या स्टॉल वर काम करत होता.  या प्रकरणी कलम 376 (D) आणि पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)