Thane Shocker: सासरच्यांच्या छळाला कंटाळून 24 वर्षीय महिलेची आत्महत्या, पती आणि सासरा पोलिसांच्या ताब्यात
पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन तिला आत्महत्ये प्रवृत्त केल्याचा दोघांवर आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक पीडितेचा पती आणि एक सासरा आहे.
ठाणे पोलिसांनी कल्याण येथून एक व्यक्ती आणि त्याच्या वडील अशा दोघांना अटक केली आहे. पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन तिला आत्महत्ये प्रवृत्त केल्याचा दोघांवर आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक पीडितेचा पती आणि एक सासरा आहे. सदर घटना कल्याण येथे घडली. कल्याण येथे एका 24 वर्षीय महिलेने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी , महिलेच्या पती आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पडीतेने कल्याण येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन रविवारी (11 डिसेंबर) आत्महत्या केली. त्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी क्षुल्लक गोष्टीवरून महिलेचा छळ करत आणि मारहाण करत असे. हा छळ सहन न झाल्याने तिने रविवारी दुपारी कल्याण येथील त्यांच्या घरी गळफास लावून घेतला, असे प्राथमिक माहिती अहवालात म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)