Thane Shocker: सासरच्यांच्या छळाला कंटाळून 24 वर्षीय महिलेची आत्महत्या, पती आणि सासरा पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पोलिसांनी कल्याण येथून एक व्यक्ती आणि त्याच्या वडील अशा दोघांना अटक केली आहे. पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन तिला आत्महत्ये प्रवृत्त केल्याचा दोघांवर आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक पीडितेचा पती आणि एक सासरा आहे.

Thane Shocker: सासरच्यांच्या छळाला कंटाळून 24 वर्षीय महिलेची आत्महत्या, पती आणि सासरा पोलिसांच्या ताब्यात
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ठाणे पोलिसांनी कल्याण येथून एक व्यक्ती आणि त्याच्या वडील अशा दोघांना अटक केली आहे. पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन तिला आत्महत्ये प्रवृत्त केल्याचा दोघांवर आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक पीडितेचा पती आणि एक सासरा आहे. सदर घटना कल्याण येथे घडली. कल्याण येथे एका 24 वर्षीय महिलेने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी , महिलेच्या पती आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पडीतेने कल्याण येथील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन रविवारी (11 डिसेंबर) आत्महत्या केली. त्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी क्षुल्लक गोष्टीवरून महिलेचा छळ करत आणि मारहाण करत असे. हा छळ सहन न झाल्याने तिने रविवारी दुपारी कल्याण येथील त्यांच्या घरी गळफास लावून घेतला, असे प्राथमिक माहिती अहवालात म्हटले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2022 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).