Thane Schools Closed Tomorrow: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर; आदेश जारी
आता उद्या देखील ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत. याबाबत महापालिकेने माहिती दिली आहे.
Thane Schools Closed Tomorrow: सध्या राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत आहे. पावसामुळे मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. सततच्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, आयएमडीनरे उद्याही अनेक भागात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर पाहता आज अनेक ठिकाणी दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता उद्या देखील ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत. याबाबत महापालिकेने माहिती दिली आहे.
सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर, अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ 1 ली ते 12 वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना 26-07-2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. (हेही वाचा: Maharashtra Rains: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे CM Eknath Shinde यांच्रे आवाहन, गरज पडल्यास लोकांना एअरलिफ्ट केले जाणार)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)