Thane Namo Central Park: ठाण्यात सुरु झाले महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे सेंट्रल पार्क; 20.5 एकर जागेवर पसरलेल्या उद्यानात 3,500 झाडे

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण झाले. हे ‘द ग्रॅंड सेंट्रल पार्क’ आता ‘नमो- द ग्रॅंड सेंट्रल पार्क‘ या नावाने ओळखले जाईल,

Thane Namo Central Park

Thane Namo Central Park: मुंबई आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी ग्रॅण्ड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे. हे उद्यान आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाणे येथे केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण झाले. हे ‘द ग्रॅंड सेंट्रल पार्क’ आता ‘नमो- द ग्रॅंड सेंट्रल पार्क‘ या नावाने ओळखले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोलशेत भागात 20.5 एकर जागेवर साकारलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला.

राज्यातील हे सगळ्यात मोठे उद्यान आहे. त्याच्या उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. सुमारे 3 हजार 500 झाडे या उद्यानात आहेत. आणखी झाडांचे नियोजन करावे. तसेच, त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणाने व्हावे. कल्पतरू डेव्हल्पर्सने टीडीआरच्या माध्यमातून हे उभे केले आहे. महानगरपालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे उद्यान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (हेही वाचा: First Public Bus Service On Atal Setu: अटल सेतूवर सुरु होणार पहिली सार्वजनिक बस सेवा; BEST ने निश्चित केला मार्ग, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now