Thane: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिली उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांना धमकी, शिवीगाळ केली; गुन्हा दाखल
आरोपीने सोशल मीडिया पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले आणि त्यांना धमकी दिली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकावल्याप्रकरणी ठाण्यातील एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी सांगितले की, 26 वर्षीय आरोपीविरुद्ध काही पुरावे सापडले आहेत, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाने उपमुख्यमंत्री शिंदे यांना इंस्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ करत धमकी दिली. शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव हितेश प्रकाश धेंडे असून, तो ठाणे येथील रहिवासी आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.
आरोपीने सोशल मीडिया पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले आणि त्यांना धमकी दिली. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 133, 352, 351(1), 356 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Sanjay Gaikwad Viral Video: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली; मतदारांना जाहीर शिवीगाळ)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी-
Thane man faces FIR for social media threats against deputy CM Eknath Shinde
Follow for more updates: https://t.co/6RyGBoWbpl
— The Indian Express (@IndianExpress) January 6, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2025 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

