Thane News: ठाण्यात इमारतीत पार्क केलेल्या BMW कारला भीषण आग, कोणीही जखमी नाही (Watch Video)

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील २५ मजली इमारतीच्या आवारात बीएमडब्ल्यू कारला आग लागली.कार एका इमारतीच्या लॉबी जवळ असताना तिला अचानक आग लागली, असं अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Ghodbunder Road BMW Car

Thane News:  ठाण्यातील घोडबंदर रोड येथील  25  मजली इमारतीच्या आवारात  बीएमडब्ल्यू (BMW) कारला आग लागली. शनिवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कारला आग लागली,  परिसराच्या बागेजवळ कार पार्किंगमध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलीस आणि अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभरात आग नियत्रंणात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now