Thane Dahi Handi 2022 Celebration: ठाण्यात अविनाश जाधव यांची मनसे दहीहंडी यंदा गोविंदा पथकाला घडवणार 'स्पेनवारी'; पहा कोणाला मिळणार संधी

दरवर्षी स्पेन मधूनही पथकं दहीहंडी सणाचा भारतातील जल्लोष बघायला मुंबई, ठाण्यात येतात.

गोविंदा पथकांसाठी ठाणे शहरं हे महत्त्वाचे आहे. अनेक मानाच्या आणि घसघशित बक्षीस देणार्‍या हंड्या ठाण्यात असतात. मनसेच्या अविनाश जाधव यांनीही यंदा दहीहंडीचं आयोजन केले आहे. यामध्ये विश्वविक्रमासोबत बरोबरी करणार्‍या पथकाला ते 'स्पेनवारी' घडवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. तसेच 9 थर लावणार्‍या पहिल्या 3 पथकांना लाखोंचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. स्पेन माध्येही मानवी मनोरे उभारले जातात.  दहीहंडीला स्पेनची पथकं देखील ठाण्यात दाखल होऊन या सणाचा आनंद लुटतात.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now