Thane: महापालिकेच्या आरोग्य केंद्रात उद्यापासून पुन्हा सुरु होणार कोविशिल्ड लसीकरण मोहीम; दिला जाणार पहिला, दुसरा व बुस्टर डोस
ज्यांचे कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण झालेले नाही तसेच ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
आजपासून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोविशिल्ड लस उपलब्ध झाली. राज्य शासनाकडून ठाणे महानगरपालिकेस कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला असून, महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात उद्यापासून (बुधवार 18 जानेवारी 2023) कोविशिल्ड लसीकरण सुरू होणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यत लसीकरण करुन घेतले नाही त्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. उद्यापासून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, किसन नगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र शिळ आरोग्य केंद्र, सी आर, वाडिया आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य, केंद्र रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, ठाणे महापालिका कौसा रुग्णालय या ठिकाणी कोविशिल्ड लसीकरण सुरू केले जाणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला, दुसरा व बुस्टर डोस दिला जाणार आहे. ज्यांचे कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण झालेले नाही तसेच ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.