Swargate ST Bus Stand Vandalized: वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाची तोडफोड; ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक

वसंत मोरे घटनेची माहिती घेण्यासाठी आगारात पोहचले असता आगार प्रमुखांकडून योग्य माहिती न मिळाल्याने त्यांनी थेट तोडफोड केली.

Vasant More Vandalized Swargate Bus Depot | X @News18lokmat

पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर आज ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली आहे. वसंत मोरे यांनी काही वेळापूर्वीच साथीदारांसोबत स्वारगेट बस डेपो मध्ये तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.  पीडित तरूणी 26 वर्षाची असून ती फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता  स्वारगेट बसस्थानकावर आली. त्यावेळी तिच्याशी गोड बोलून एसटीमध्येच आरोपीने बलात्कार केला. वसंत मोरे घटनेची माहिती घेण्यासाठी आगारात पोहचले असता  आगार प्रमुखांकडून योग्य माहिती न मिळाल्याने त्यांनी थेट तोडफोड केली.

स्वारगेट बस डेपोत तोडफोड 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement