Swargate Metro Station Pics: स्वारगेट मेट्रो स्टेशन उद्घाटनासाठी सज्ज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या पार पडणार सोहळा, पाहा फोटो

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. PM मोदी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुण्याला भेट देणार आहेत, या दरम्यान, पंतप्रधान मोदी स्वारगेट येथील मेट्रो स्टेशन चे उद्घाटन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो सेवेचे उद्घाटन करणार आहेत.

Swargate Metro Station Pics

Swargate Metro Station Pics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर  आहेत. PM मोदी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुण्याला भेट देणार आहेत, या दरम्यान, पंतप्रधान मोदी  स्वारगेट येथील मेट्रो स्टेशन चे उद्घाटन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो सेवेचे उद्घाटन करणार आहेत. शहरातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्यामुळे वाहतुकीची समस्या दूर होणार आहे. यासोबतच स्वारगेट ते कात्रजपर्यंत मेट्रो सेवेच्या विस्ताराची पायाभरणीही केली जाणार असून, त्यामुळे दक्षिण पुण्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. पिंपरी चिंचवड ते निगडी या उन्नत मेट्रो मार्गाच्या बांधकामाची पायाभरणीही होणार आहे. दरम्यान, मोदींच्या उद्घाटनापूर्वी  स्वारगेट येथील मेट्रो स्टेशनचे फोटो समोर आले आहेत. हे देखील वाचा: Pune Weather Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; PM नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात चिखल? जाणून घ्या हवामान अंदाज

येथे पाहा, स्वारगेट येथील मेट्रो स्टेशनचे फोटो 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now