Sushma Andhare: राज ठाकरेंचं पत्र म्हणजे भाजपची स्क्रिप्ट, शिवसेना नेत्या सुष्मा अंधारेंचा भाजपसह मनसेला खोचक टोला
राज ठाकरेंनी लिहलेल्या पत्रामुळे भाजपने ही निवडणुक मागे घेतली असेल तर राज ठाकरेंनी फॉक्सकॉन प्रकल्प परत आणण्याचं किंवा महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्याबाबत भाजपला पत्र लिहावे असा सल्ला सुष्मा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे.
भाजपने (BJP) अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून (Andheri East By Election) आपला उमेदवार मूरजी पटेल (Murji Patel) नुकताचं मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच भाजप (BJP) ही निवडणूक लढवणार नाही अशी माहिती भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिली आहे. संबंधीत शिवसेना नेत्या सुष्मा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपसह मनसेला (MNS) खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी लिहलेल्या पत्रामुळे भाजपने ही निवडणुक मागे घेतली असेल तर राज ठाकरेंनी फॉक्सकॉन प्रकल्प परत आणण्याचं किंवा महाराष्ट्राचे राज्यपाल बदलण्याबाबत भाजपला पत्र लिहावे असा सल्ला सुष्मा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)