Supriya Sule vs Sunetra Pawar: बारामती मध्ये लोकसभा निवडणूक निकालापूर्वी पोस्टर वॉर; झळकले सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स
एक्झिट पोलचा अंदाज पाहून उत्साही कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींच्याही विजयाचे पोस्टर झळकवले आहेत.
महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे सार्यांचे लक्ष आहे. पवार कुटुंबातील नणंद-भावजया एकमेकींसमोर निवडणूकीच्या रिंगणात असताना आता एक्झिट पोलचा अंदाज पाहता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघींच्याही विजयाचे पोस्टर झळकले आहेत. एक्झिट पोल मध्ये अजित पवारांना एकाच जागेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ती 1 जागा कोणती असेल यावर तर्क बांधले जात आहेत तर शरद पवारांचा स्ट्राईक रेट चांगला असेल असे अंदाज एक्झिट पोल मध्ये आल्यानंतर आता बारामतीची जागा शरद पवारांकडेच असेल असे मानून त्यांच्या कार्यकर्त्यांनीही जल्लोष सुरू केला आहे.
महाराष्ट्र के बारामती में अलग ही खेल चल रहा है.
बारामती में अभी से सुप्रिया सुले और सुनेत्रा पवार के जीत के पोस्टर लग चुके है.
अब 4 जून को किसका पोस्टर उतरने वाला है, वो देखना पड़ेगा. pic.twitter.com/2ZHj2KF0uT
— Vivek Gupta (@imvivekgupta) June 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2024 02:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

