Supreme Court On Sharad Pawar's Plea: शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरते नाव कायम राहणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
न्यायालयाने सांगितले की, निवडणूक आयोगाचा 7 फेब्रुवारीचा आदेश, ज्यामध्ये शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता, तो कायम राहील.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या, शरद पवार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ओळखण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात नोटीस बजावली. न्यायालयाने सांगितले की, निवडणूक आयोगाचा 7 फेब्रुवारीचा आदेश, ज्यामध्ये शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता, तो कायम राहील. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरते नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. नवीन निवडणूक चिन्ह वाटपासाठी शरद पवार निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (हेही वाचा: Waris Pathan Detained: AIMIM नेते वारिस पठाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मीरारोडला जाताना रोखले)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)