Student Goes Missing on Exam Day: नवी मुंबईत परीक्षेच्या दिवशी 12वीचा विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू

घनसोली भागातील मुलगा सकाळी 8.45 च्या सुमारास वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही.

Missing | (Photo credit: archived, edited, representative image)

Student Goes Missing on Exam Day: महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे एक 17 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा 12वी बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी घरातून निघाला होता पण त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळपर्यंत मुलगा घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तो न सापडल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गुरुवारी या घटनेची माहिती दिली. रबाळे पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, घनसोली भागातील मुलगा सकाळी 8.45 च्या सुमारास वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही, त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याचा शोध घेतला आणि नंतर पोलिसांकडे संपर्क साधला. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण) अंतर्गत  घटनेची नोंदणी केली असून, तपास अजूनही चालू आहे. (हेही वाचा: Latur Shocker: मानसिक दृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तीने वृध्द आईची केली हत्या, लातूरमधील घटना)

Maharashtra: Class 12 Student Goes Missing on Exam Day in Navi Mumbai, Police Launch Search#Maharashtra #MaharashtraNews #NaviMumbai #NaviMumbaiPolice https://t.co/LZBMgzlSyg

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now