Stones Pelted on Aaditya Thackeray's Car: आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद मध्ये किरकोळ दगडफेक (See Photos)

औरंगाबाद दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली. सुदैवाने आदित्य यांची गाडी त्यानंतर संपूर्ण सुरक्षेमध्ये बाहेर काढण्यात आली.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौर्‍याच्या सातव्या सत्राला सुरूवात झाली आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे गटाच्या वाकयुद्धा दरम्यान काल औरंगाबाद दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली. यावेळेस आदित्य च्या गाडीवर दगडफेक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now