State Marathi Film Awards Ceremony 2025: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. 25 एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे हा सोहळा होणार होता पण आता हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुरस्कार सोहळ्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असंही त्यांनी X वर केलेल्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे. नक्की वाचा: Marathi Cinema At Cannes Film Festival 2025: ‘खालिद का शिवाजी’, ’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’सह ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची यंदा 'कान्स फिल्म फेस्टिवल' मध्ये निवड.
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)