ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तेरावा दिवस; आतापर्यंत MSRTC चे 918 कर्मचारी निलंबित
राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या संपावर आहेत
राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या संपावर आहेत. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज संपाचा तेरावा दिवस होता. आजही राज्यातील 250 बस डेपो बंद राहिले. त्यामुळे आक्रमक झालेल्या राज्य सरकारने कारवाईस सुरुवात केली आहे. राज्य सरकारने आज 542 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. कालही संपात सामील असलेल्या 376 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले होते. अशाप्रकारे राज्यभरात आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)