ST Bus Ticket Price Hike: ऐन दिवाळीत लाल परीचा प्रवास महागणार, एसटी तिकीटांचे दर 10 टक्क्यांनी वाढणार

एसटी बसच्या तिकीट दरात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तिकीटांत होणार ही वाढ फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे.

ST Bus | (Photo Credits: MSRTC)

दिवाळी (Diwali) अगदी आठवड्यावर येवून ठेपली आहे. राज्यातील मोठ्या शहरात कामाला असणारे चाकरमानी किंवा विद्यार्थी (Students) घरी जाण्याचं नियोजन करीत आहेत. पण ऐवढ्यातचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणारी माहिती पुढे येत आहे. कारण एसटी बसच्या तिकीट दरात 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तिकीटांत होणार ही वाढ फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. दिवाळीच्या काळात एसटी बसेसला जास्त गर्दी असते. या गर्दीच्या हंगामामध्ये महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय हा पासधारकांना लागू नसणार आहे. मासिक आणि विद्यार्थी पासेसना (ST Bus Pass) ही भाडेवाढ लागू नाही.

 

एसटी बसच्या तिकिटांवरील वाढ ही 21 ऑक्टोबर (October) ते 31 ऑक्टोबर म्हणजे दहा दिवसांसाठी असणार आहे. नवीन भाडेवाढ ही परिवर्तन, निमआरामी हिरकणी (Hirkani), शिवशाही (Shivshahi) आणि स्लिपर कोच बसेससाठी (Slipper Coach Buses) लागू असणार आहे. तरी  एसटी महामंडळाचे महसूल तोट्यात असल्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Rain Updates: वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, राज्यभर परतीच्या पावसाचा कहर; शेतीचं मोठं नुकसान)

 

तरी दिवाळी निमित्त तुम्ही देखील एसटी बसने प्रवास करण्याचं नियोजन करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण रेल्वेचं आरक्षण (Train Reservation) वेळेवर मिळणं कठीण झालं आहे कारण तीन महिन्यांपूर्वीचं आरक्षित तिकीटा संपल्या आहेत त्यात आता एसटी बसचा पर्याय होता पण तिकीट वाढीमुळे आता त्यावरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माम झालं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now