Mumbai Special Local Train For New Year: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धावणार विशेष लोकल ट्रेन, पहा अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक

31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना हे नवीन वर्ष चोवीस तास साजरे करता येणार आहे.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

Mumbai Special Local Train For New Year: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे (Western Railway) नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल गाड्या (Special Local Train) चालविणार आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना हे नवीन वर्ष चोवीस तास साजरे करता येणार आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Female RPF Officer च्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले महिलेले जीवनदान; मुंबई मधील घटना (Watch Video))

येथे पहा अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now