Monsoon In Maharashtra Update: नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन; हवामान विभागानुसार पाहा राज्यात कुठपर्यंत आला मान्सून?
पुढील २४ तासांत दक्षिण कोकणातील काही भाग, घाट परिसर आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सूनची वाट पाहणार्यांना हवामान विभागाने आनंद वार्ता दिली आहे. अखेर महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले असल्याची माहिती वेधशाळेने दिले आहे. IMD Pune चे प्रमुख K S Hosalikar यांनी X वर पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर करण्यात आली आहे. त्यांच्या माहितीनुसार, मान्सून कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. आता नागरिकांना, शेतकर्यांना दमदार सरी बरसण्याची प्रतिक्षा आहे. पुढील २४ तासांत दक्षिण कोकणातील काही भाग, घाट परिसर आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. Mumbai Weather Prediction Today: हवामान विभागाकडून मुंबई शहराला आज यलो अलर्ट; 80% जोरदार पावसाचा अंदाज .
पहा महाराष्ट्रात मान्सून कुठपर्यंत आला?