Pune Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार; भरधाव कार दुचाकीवर आदळली अन् दोघेही फरफटत गेले (Video)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाकड येथील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ हादरवून टाकणार अपघात घडला. ज्यामध्ये वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. ज्यात दोघे जखमी झाले.

Photo Credit- X

Pune Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) वाकड येथील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ एक अपघाताचा (Accident) थरार घडला. ज्यामध्ये वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर बसलेल्या एकाचे हॅल्मेट हवेत मागच्या बाजूला उडाले आणि दोघेही दुचाकीस्वार दूरवर पुढे फरफटत गेले. व्हिडीओ मध्ये एका व्यक्तीचे कपडे फाटले गेल्याचे दिसते. तसचे तो रक्तबंबाळ झाल्याच पण पहायला मिळतयं. जखमी व्यक्ती अपघातानंतर रस्त्याच्या कडेला जातो आणि रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला जाऊन पडतो. डॅशकॅमवर कैद झालेल्या या घटनेत एका काळ्या रंगाची कार नियंत्रणाबाहेर जाते आणि दुचाकीला धडकल्याचे दिसून येते. (IIt Baba Troll After Ind vs Pak Match: टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाच भाकीत ठरल खोट; नेटकऱ्यांनी चांगल सुनावल)

भरधाव कार दुचाकीवर आदळली अन् दोघेही फरफटत गेले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now