Shocking Accident Helmet Footage: कोल्हापूरच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या 23 वर्षीय मुलाचा अपघातामध्ये मृत्यू; 12 लाखांची गाडी व 70,000 हजारांच्या हेल्मेटचे झाले तुकडे (Video)
माहितीनुसार, सिद्धेश आणि त्याचे चार मित्र आंबोली घाटावर गेले होते. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचे 70,000 रुपयांच्या महागड्या हेल्मेटचे तुकडे तुकडे झाले आणि सिद्धेशच्या डोक्याला, छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.
कोल्हापूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा 23 वर्षीय मुलगा सिद्धेश रेडेकर याचा, आजरा-आंबोली महामार्गावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास माद्याळ फाटा येथे एका वळणावर समोरून आलेल्या कारला दुचाकीची धडक होऊन अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा सिद्धेश हा त्याची 12 लाख रुपयांची स्पोर्ट्स बाईक चालवत होता. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात अपघाताचे संभाव्य कारण अतिवेग असल्याचे दिसून आले आहे. सिद्धेशच्या हेल्मेटमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यामध्ये अपघाताचे फुटेज चीत्रोत झाले आहे. दुचाकी धोकादायक वेगाने वेगाने जात असताना, सिद्धेश जीवघेणी टक्कर होण्यापूर्वी दोनदा हँडलबार सोडताना दिसतो. अपघातापूर्वी त्याच्या दुचाकीची गती प्रतितास 142 किलोमीटर होती.
या भयावह फुटेजमुळे आधुनिक सुरक्षा उपकरणांसह देखील उच्च वेगाने गाडी चालवण्याच्या धोक्यांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. माहितीनुसार, सिद्धेश आणि त्याचे चार मित्र आंबोली घाटावर गेले होते. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचे 70,000 रुपयांच्या महागड्या हेल्मेटचे तुकडे तुकडे झाले आणि सिद्धेशच्या डोक्याला, छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मित्रांनी त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा: Mundhwa Chowk Pune Viral Video: मुंढवा चौकात वाहतूक कोंडी, संतप्त महिलेने पुणे पोलिसांना विचारला जाब; व्हिडिओ व्हायरल)
Shocking Accident Helmet Footage:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)