Shivsena Clash: शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांच्या राड्यानंतर 50 ते 60 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात 50 ते 60 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी केली गेली. यावेळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव हा निर्माण झाला होता. दरम्यान एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात 50 ते 60 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. भादंवि आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये पुढील तपास करण्यात येत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)