Shiv Sena Foundation Day 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान, '...जाहिरनाम्यात जे सांगितले ते पूर्ण करा'
हे मोदी सरकार पडावे आणि निवडणुका व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून आम्ही इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकू.'
Shiv Sena Foundation Day 2024: आज मुंबईमध्ये मुंबई शिवसेनेचा 58 वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात, ‘आज मी फक्त आमच्या विजयी खासदारांचेच नव्हे, तर जे जिंकले नाहीत त्यांचेही स्वागत करतो. हे मोदी सरकार पडावे आणि निवडणुका व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून आम्ही इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकू. मोदीजींनी आजपासूनच विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करावा. मी पंतप्रधान मोदींना आव्हान देतो की, त्यांनी आंध्र प्रदेशात जावे आणि चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या जाहीरनाम्यात जे काही सांगितले आहे ते ते पूर्ण करावे. चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या जाहिरनाम्यामध्ये मुस्लिमांना आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करणार आहात का?’
ते पुढे म्हणतात, ‘हिंदू, मुस्लिम, ख्रिश्नन समाजाची मते मिळाली आहे. संविधान वाचवण्यासाठी आम्हाला सगळ्या देशभक्तांनी आणि समाजांनी मते दिली, त्यामुळे आम्ही हिंदूत्व सोडले असे होत नाही. उलट भाजपने सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्व सोडले आहे.’ (हेही वाचा: Pune Security Guard Suicide Over Maratha Reservation: ‘जरांगे साहेब, मागे हटू नका’; मराठा आरक्षणाची मागणी करत फेसबुकवर लाईव्ह करत पुण्यातील सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)