Shishir Shinde Resigned: ठाकरे गटाला शिशिर शिंदेचा जय महाराष्ट्र; पक्षात मनासारखं काम मिळत नसल्याचे केला आरोप

19 जून 2018 रोजी शिशिर शिंदे यांची मनसेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती.

Shishir Shinde

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला मनासारखं काम मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आपण राजीनामाचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे असे शिशिर शिंदे यांनी सांगितले. 19 जून 2018 रोजी शिशिर शिंदे यांची मनसेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती.

"चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते." असे शिशिर शिंदे यांनी म्हटले

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement