Shilphata Gangrape-Murder Case: शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; Ujjwal Nikam यांच्या नियुक्तीच्या सुचना
महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
Shilphata Gangrape-Murder Case: मंदिराच्या पवित्र परिसरात वेक महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना शिळफाटा येथे उघडकीस आली होती. महत्वाचे म्हणजे इथल्या गणेश घोळ मंदिरात तीन पुजाऱ्यांनी या विवाहित महिलेवर बलात्कार केला होता. घरातील वादाला कंटाळून ही महिला मंदिरात आली होती मात्र पुजाऱ्यांनी तिला चहातून नशेचे औषध देऊन तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला. आता राज्य सरकार या घटनेबाबत कडक कारवाई करणार आहे.
घडल्या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यात येईल. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात या, तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या. महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. (हेही वाचा: Yashashree Shinde Murder: नवी मुंबईत एका तरुणीची निर्घृण हत्या, चेहरा दगडाने ठेचला, प्राइवेट पार्टमधेही केल्या अनेक जखमा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)