Sexual Relationship Out Of Love: 'लैंगिक संबंध प्रेमाचे होते, वासनेचे नव्हते’; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाला जामीन मंजूर
अहवालानुसार, 23 ऑगस्ट 2020 रोजी मुलगी आरोपीसोबत स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती. तपासात दोघे बेंगळुरू येथे सापडले. त्यानंतर तरुणाला 30 ऑगस्ट 2020 रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो कोठडीत होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीला जामीन मंजूर केला. या दोघांमधील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून त्यात प्रेमाची भावना दिसत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, एकल न्यायाधीश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असली तरी तिने स्वतःहून तिच्या पालकांचे घर सोडले आहे. तिच्या पोलीस स्टेटमेंटमध्ये, मुलीने आरोपी व्यक्तीसोबत तिचे ‘प्रेमसंबंध’ असल्याची कबुलीही दिली होती. कोर्टाने पुढे ही वस्तुस्थिती लक्षात घेतली की, ती अर्जदार (आरोपी) सोबत विविध ठिकाणी राहिली आणि तिला जबरदस्तीने नेण्यात आले अशी कोणतीही तक्रार तिने केलेली नाही. खंडपीठाने म्हटले की, प्रेमामुळेच ती अर्जदाराशी (आरोपी) जोडली गेली. त्यामुळे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार झाले असे म्हणता येणार नाही.
अहवालानुसार, 23 ऑगस्ट 2020 रोजी मुलगी आरोपीसोबत स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती. तपासात दोघे बेंगळुरू येथे सापडले. त्यानंतर तरुणाला 30 ऑगस्ट 2020 रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो कोठडीत होता. (हेही वाचा: Porn Addiction in Gen Z: उच्च न्यायालयाने व्यक्त केली किशोरवयीन मुलांमधील पॉर्न व्यसनाबद्दल चिंता; समुपदेशनाची गरज असल्याचे निरीक्षण)
Sexual relationship was out of love not lust: Bombay High Court allows bail to man booked for raping minor
report by @NarsiBenwal https://t.co/fzeaBe7iTs
— Bar & Bench (@barandbench) January 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2024 06:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

