IPL Auction 2025 Live

Setback For Thackeray Camp: निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; जाणून घ्या CM Eknath Shinde यांची पहिली प्रतिक्रिया (Watch)

खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची की एकनाथ शिंदे गटाची हे निवडणूक आयोग ठरवेल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची की एकनाथ शिंदे गटाची हे निवडणूक आयोग ठरवेल असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पक्षाचे वर्चस्व, नाव आणि चिन्हाच्या अधिकाराबाबत निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे गटामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

अशात या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणतात, ‘लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते आणि आज बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाहीमध्ये जे काही अपेक्षित होते ते घडले आहे.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)