Padmakar Valvi Joins BJP: कॉंग्रेसचे माजी आमदार, मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजप मध्ये प्रवेश; लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला महाराष्ट्रात झटका!

पद्माकर वळवी हे उत्तर महाराष्ट्रातले मोठे नेते असल्याने लोकसभेपूर्वी त्यांचा भाजपा मधील पक्षप्रवेश हा कॉंग्रेस साठी मोठा धक्का आहे.

Padmakar Valvi | Twitter

अशोक चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये आज कॉंग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi ) यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. वळवींनी 2009 च्या निवडणूकीमध्ये नंदुरबारच्या शाहदा विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्त्व केले आहे. त्यांनी राज्याच्या क्रीडा मंत्रालयाची, नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची  जबाबदारी सांभाळली आहे. वळवी हे उत्तर महाराष्ट्रातले मोठे नेते असल्याने लोकसभेपूर्वी त्यांचा भाजपा मधील पक्षप्रवेश हा कॉंग्रेस साठी मोठा धक्का आहे. आज राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा घेऊन नंदुरबार मध्ये दाखल होत असताना पद्माकर वळवींनी  कॉंग्रेसची साथ सोडली आहे.

पहा पक्षप्रवेशाचा क्षण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement