School Holidays in Maharashtra: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना 20 जुलै रोजी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे प्रशासनाचा निर्णय

सतत पडत असलेला पाऊस पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्या राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. उद्यासाठी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना 20 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या अंदाजामुळे सुट्टी जाहीर केली आहे. सतत पडत असलेला पाऊस पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यटनस्थळी जाण्याचे टाळावे. समुद्र किनाऱ्यांवर जावू नये. पोलीस यंत्रणेने पर्यटनस्थळांवर गस्त घालावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

(हेही वाचा: उद्या रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट; जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)