Satara News: साताऱ्यातील पुसेसावळी हिंसाचार प्रकरणी 23 जणांना अटक

सोशल मीडियावर अज्ञातांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने दोन गटात रात्री 9.30 च्या दरम्यान वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की जमाव प्रक्षुब्ध झाला. त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

Arrested | (File Image)

सातारा जिल्ह्यातील खाटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात अज्ञातांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या कारणावरुन दोन गटात जोरदार वादावादी झाली. त्यातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. परिणामी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा विचारात घेऊन गंभीर पावले

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार घडला. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेकही झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता 23 जणांना अटक करण्यात आली आहे.  (हेही वाचा - Pune Crime: पुण्यात गणपतीच्या वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण, घटना कॅमेरात कैद)

सोशल मीडियावर अज्ञातांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने  दोन गटात रात्री 9.30 च्या दरम्यान वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की जमाव प्रक्षुब्ध झाला. त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी जाळपोळही झाली. लोक आमनेसामने आले. त्यातून पुन्हा काही हिंसक घटना घडल्या. ज्यात चार लोक जखमी झाले. एकाचा मृत्यू देखील झाला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now