Satara: खासदार Dr Shrikant Shinde आपल्या गावी अनुभवत आहेत 'गावपण'; केली भात लागवड, गाईंना खाऊ घातला चारा (Watch Videos)
या ठिकाणी ते गावपण अनुभवत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे सध्या त्यांच्या सातारा जिह्यातील गावी आहेत. या ठिकाणी ते गावपण अनुभवत आहेत. यावेळी त्यांनी भातशेतीत मळ्यात भातरोपे लावली, तसेच गावच्या शेतात गाईंना चारा खाऊ घातला.
याबाबत लेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, ‘समाधान आणि सुख या शब्दांचा समानार्थी शब्द फक्त गावचे घर हाच असतो. दिवस वेगाने सरकतात पण अजूनही गावचे घर आठवलं की मग जगण्याची खरी श्रीमंती म्हणजे काय ते समजते. गावच्या शेतीत रमणे आणि गुरावासरांना मायेने जवळ घेणे ही गोकुळश्रीमंती अनुभवताना त्याबद्दल शब्दांत लिहिणे हे कठीण असते. पानापानातुन वाढणारे झाड, भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती. गुरंवासरे त्यांचा मुकेपणा, त्यांची माया हे सगळं अबोल असते पण तरीही ते खूप बोलकं असते. हे गावपण अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाचं हे देणं जगण्याचा भाग असणं यापेक्षा वेगळं भाग्य नाही.’ (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवस पाऊस वाढीचे- आयएमडी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)