MSRTC Bus Accident: शनिवारी सकाळी मुंबई सातारा एमएसआरटीसी (एसटी) बसचा ठाण्यातील विवियाना मॉलसमोर अपघात झाला. व्हायरल होत असलेल्या व्हिज्युअल्सवरून असे दिसते की बस कंटेनरला धडकली आहे. या अपघातात बस चालक व वाहक गंभीर जखमी झाले. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपास सुरू आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अधिकारी अपघाताची जागा साफ करताना आणि बस काढताना दिसत आहेत. बसचा पुढचा भाग पूर्णपणे खराब झाला. (हेही वाचा - Mumbai Megablock: मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक,पाहा वेळापत्रक)
#Thane News: A @msrtcofficial bus en route to Satara crashed into a container on Saturday morning opposite #VivianaMall. Injured persons have been moved to a nearby #hospital#Accident #ThaneNews #Thane #MSRTC pic.twitter.com/kjcFxOk0da
— Free Press Journal (@fpjindia) July 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)