Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीच्या संदर्भात बैठक'; भाजप आमदार Suresh Dhas यांचा मोठा आरोप (Video)

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणी वसूल करण्याबाबत धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक झाली होती व या बैठकीबाबत मुंडे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले, असे धस म्हणाले आहेत.

Suresh Dhas | X @PTI

संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी ठरवण्यात आले होते. त्यानंतर आता आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मुंडे यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणी वसूल करण्याबाबत धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक झाली होती व या बैठकीबाबत मुंडे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले, असे धस म्हणाले आहेत. मुंबईत पत्रकारांशी बोलताना धस यांनी आरोप केला की, मुंडे यांच्या 'सातपुरा' बंगल्यात खंडणी वसुलीसाठी एक बैठक झाली होती आणि त्यांना याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल.

त्यांनी पुढे असाही दावा केला की, धनंजय मुंडे यांच्या चुलत बहिणी, राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये म्हटले होते की, वाल्मिक कराडशिवाय राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही, अशा परिस्थितीत, मुंडेंच्या माहितीशिवाय देशमुख यांची हत्या कशी झाली असेल?. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांचे गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील एका ऊर्जा कंपनीला लक्ष्य करून खंडणीचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून, अपहरण करण्यात आले, त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. (हेही वाचा: Minister Dhananjay Munde Resigns: अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा; सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे वाढला होता दबाव)

Santosh Deshmukh Murder Case: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement